जम्मू-काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जम्मू-काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीगनर : जम्मू-काश्मिरातील श्रीनगर येथे आज, शुक्रवारी सकाळी सुरक्षादलाच्या जवानांनी लश्कर--तैय्यबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ट्विटकरुन ही माहिती दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील दानमार भागात अलामदार कॉलनी येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान 2 दहशतवादी ठार झाले. तर या परिसरात शोध मोहिम ही अद्याप चालूच आहे. हे दोन दहशतवादी हे स्थानिक असून त्यांचा लश्कर--तैय्यबाशी संबंध असल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले आहे. दरम्यान सकाळी बराच वेळ या भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानामध्ये चकमक सुरू होती. यावेळी या भागात लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला आहे. दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी परिरसराला घेरा टाकला असून अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.