रणजितच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रणजितच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी

नवी दिल्ली, : बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिम आणि अन्य 5 आरोपींना दोषी ठरवण्यात आलेय. रणजित सिंगची 2002 मध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी येत्या 12 ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
मृत रणजीत सिंह हा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक होता. त्याची 10 जुलै 2002 रोजी त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी रणजीत सिंग हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. तर, रणजीत सिंगचा मुलगा जगसीर सिंह याने न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

या आठवड्याच्या सुरुवातीला, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग यांच्या विरोधातील खुनाचा खटला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून इतर कोणत्याही सीबीआय न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. आता पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर पाच आरोपींना आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत हत्येचे दोषी ठरवले आहे. याप्रकरणी 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाणार आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये आहे. दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुरुमीत राम रहिमला 2018 साली 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून सुनारिया तुरुंगात तो शिक्षा भोगत आहे.