एनपीएनटी अनुरूप ड्रोन संचलनासाठी 166 अतिरिक्त हरित क्षेत्र मंजूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एनपीएनटी अनुरूप ड्रोन संचलनासाठी 166 अतिरिक्त हरित क्षेत्र मंजूर

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत देशात ड्रोन संचालन अधिक सुविधेचे सुरळीत करून त्याला चालना देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एनपीएनटी (नो परमिशन नो टेक ऑफ) अनुरूप ड्रोन संचलनासाठी 166 अतिरिक्त हरित क्षेत्र स्थळांना मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळालेल्या क्षेत्रांमध्ये जमीन स्तरापासून 400 फुटांपर्यंत ड्रोन वापरासाठी परवानगी आहे. यापूर्वी मंजुरी दिलेल्या 66 हरित क्षेत्र स्थळां व्यतिरिक्त ही क्षेत्रे आहेत. मंजुरी असलेल्या हरित क्षेत्र स्थळांची यादी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर (https://digitalsky.dgca.gov.in) उपलब्ध आहे.

डीजीसीएनुसार एनपीएनटी किंवा परवानगी नाही - उड्डाण नाही" अंतर्गतप्रत्येक दूरस्थ संचालित विमानाला  (नॅनो वगळता) भारतात संचालनापूर्वी डिजिटल स्काई प्लॅटफॉर्मद्वारे वैध परवानगी प्राप्त करावी लागते. 

या आराखड्यामुळे वापरकर्त्यांना दूरस्थ संचालित विमानासाठीराष्ट्रीय मानवरहित वाहतूक व्यवस्थापनासाठी असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.  मंजुरी असलेल्या हरित क्षेत्रात उड्डाण करण्यासाठी केवळ डिजिटल स्काई पोर्टल किंवा अ‍ॅपद्वारे उड्डाणाची  वेळ आणि स्थान सूचित करणे आवश्यक आहे. अतिरिक्त हरित क्षेत्र स्थळांमध्ये ड्रोन उड्डाणे 12 मार्च 2021 रोजीच्या मानवरहित विमान प्रणाली  नियम 2021 आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या इतर संबंधित आदेश/मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतील.