वादळापूर्वीची शांतता?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वादळापूर्वीची शांतता?

पुढील शंभर वर्षात राज्यात विरोधी पक्षाची  सत्ता येणार नाहि, असे हास्यास्पद विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले असले तरीही राज्यात सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या वादळापूर्वीची शांतता आहे की काय, असे वाटू लागले आहे. राऊत यांना आता कुणीही गांभिर्याने घेत नाहि आणि स्वतःल मुख्यमंत्रि तरी त्याना फारसे गांभिर्याने घेत असतील, असे वाटत नाहि. राऊत हे सरकारमध्ये असून पक्षात आहेत आणि पक्षात असून सरकारमध्ये असल्यासारखे भासवतात. त्यांच्या वक्तव्यांना राजकीय नेत्यांनी मनावर घेणे कधीचेच सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचे जाऊ द्या. तरी राऊत यांनी शंभर वर्षांचीच हमी दिली आहे. आचार्य अत्रे असते तर कदाचित पुढील दहा हजार वर्षात विरोधकांची सत्ता येणार नाहि, असेही म्हणाले असते. परंतु राज्यात राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक सिल्व्हर ओकमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि मविआ सरकारचे तारणहार शरद पवार यांची भेट घेतली. सध्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील कटुता खूपच कमी झालेली दिसते आहे. राष्ट्रवादीचे नेते भाजपवर थेट आरोप करताना दिसत नाहित. पंतप्रधान मोदींवर तर आरोप राष्ट्रवादीचा एकही वरिष्ठ नेता करताना दिसत नाहि. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी पवार गांधीनगरला केंद्रिय गृहमंत्रि अमित शहा यांची भेट घेऊन आले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांचा एकमेकांबद्दलचा सुर मवाळ झालेला दिसतो आहे. हे कशाचे लक्षण आहे, हे सारे जण जाणतात. त्यामुळेच कदाचित राऊत यांच्या पोटात गोळा आला असेल. फडणवीस यांनी पवार यांची सध्याच्या राजकीय कटुता शिगेला पोहचलेली असताना भेट घेणे अत्यंत महत्वाची घडामोड आहे. फडणवीस यांनी या भेटीला राजकीय अर्थ देऊ नका, वगैरे नेहमीप्रमाणे वक्तव्य केले असले तरीही त्यात काहीच अर्थ नसतो, हे लहान मूलही आता समजते. पवार आणि फडणवीस यांच्या भेटीने कदाचित शिवसेनेला संदेश दिला असावा. शिवसेना सध्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. खुद्द मुख्यमंत्रि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. माजी गृहमंत्रि अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यास विलंब झाल्यामुळे ठाकरे नाराज होते, असे सांगितले जाते. मुळात ठाकरे हे केवळ पवार यांच्या राजकीय मोर्चेबांधणीने मुख्यमंत्रि होऊ शकले आहेत. त्यामुळे ठाकरे खुद्द पवार यांच्यावरच नाराज होत असतील तर पवार ते सहन करणार नाहित. त्यामुळे फडणवीस भेटीने ठाकरेंना  खरा इषारा दिला आहे, असे दिसते आहे. राजकीय वर्तुळात विविध चर्चा आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर असलेला ओबीसी समाज नाराज आहे. ओबीसीचा सारा राग महाविकास सरकारवरच आहे. खरेतर छगन भुजबळ यांनी ओबीसींवर अन्याय झाल्याप्रकरणी तोंडही उघडलेले नाहि. या क्षणी ते जर मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले तर ते नायक ठरतील. परंतु त्यांना सत्ता सोडवत नाहि. त्यांचे जाऊ द्या. ओबीसी समाज नाराज आहे तर मराठा समाज तर संतप्त आहे. फडणवीस यांच्या काळात जवळपास निश्चित झालेले मराठा आरक्षण मविआ सरकारच्या नाकर्तेपणाने गेले, अशी मराठ्यांची भावना आहे. त्याचा फटका कधीही निवडणुका झाल्या तर सरकारला बसणार आहे. यामुळे खुद्द पवारांनाच आता या सरकारबद्दल खात्री वाटत नाहि की काय, अशी शंका वाटते. शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबरोबर गेलो तर निवडणुकीत आपल्याला साफ झोपावे लागेल, ही भीती पवारांना वाटत असावी. याचे कारण शिवसेना कधीच मराठा आरक्षणाच्या बाजूने नाहि, अशी भावना तयार करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले आहेत. सामनाने छापलेले व्यंगचित्र हे ठाकरे आणि शिवसेना यांना कायम छळत रहाणार आहे. त्यातच नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन दौरे काढण्यास सुरूवात केली आहे. यानिमित्ताने राणे यांना मोठे पाठबळ मिळत आहे. वारे कुणीकडे वहाते आहे, याचे अचूक ज्ञान राजकीय नेत्यांना असतेच. त्याशिवाय ते राजकारणात यशस्वी होऊच शकत नाहित. पवारांना तर अगोदरच सारे समजत असते. त्यामुळे महाविकास सरकार हे बुडते जहाज असल्याचे त्यांना वाटत असेल तर सांगता येत नाहि. परंतु पवार हे आपल्या खर्या भावना कधीही बोलून दाखवत नाहित. महाविकास सरकार पंचवीस वर्षे, आता शंभर वर्षे टिकेल, अशी आचरट विधाने राऊत करत असले तरीही पवार यांनी हे सरकार पाच वर्ष काढेल, असेही विधान एकदाही केलेले नाहि. यावरून खुद्द पवारांनाच सरकारबद्दल विश्वास वाटत नाहि, असा अंदाज लावता येतो. तिकडे काँग्रेसही नाराज आहे. आणि काँग्रेसचे मंत्रि नितीन राऊत यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्याने पवार अस्वस्थ असावेत. अर्थात या सार्या राजकीय वर्तुळात रंगणार्या चर्चा असल्या तरीही आग लागल्याशिवाय धूर होत नाहि, असे म्हणतात. काँग्रेसचे मंत्रि सरकारमध्ये नाराज आहेत. एकापाठोपाठ एक राज्ये काँग्रेसच्या हातून चालली आहेत. पंजाबमध्ये सव्वीस आमदारांनी बंड पुकारण्याच्या पवित्र्यात आहेत. मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात आडवा विस्तव जात नाहि. त्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेस आपलेच घर सावरण्याच्या प्रयत्नात आहे. नेतृत्वाचा पेच काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे काँग्रेस कधीही या सरकारमधून बाहेर पडू शकते. ही सर्व परिस्थिती पहाता पवार आणि फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, हे मात्र खरे आहे. त्यातच फडणवीस यांनी जळगावच्या दौर्यावर असताना त्यांचे ज्यांच्याशी तीव्र वितुष्ट आहे, त्या माजी मंत्रि एकनाथ खडसे यांची भेट घेतली. हाही मुद्दा शिवसेनेच्या पोटात गोळा आणणारा आहे. त्यामुळे राऊत काहीही म्हणत असले तरीही ही वादळापूर्वीची शांतता आहे का, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.