आपल्या देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही तरी करत राहिले पाहिजे - प्रसून जोशी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आपल्या देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी काही तरी करत राहिले पाहिजे - प्रसून जोशी

मुंबई : प्रत्येक व्यक्ती आणि संपूर्ण समाजाला आपला 'ट्रुथ कोशंट' वाढवण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने, श्री. वल्लभ भंन्शाली यांच्या 'सत्य विज्ञान फाउंडेशन'चा उपक्रमट्रुथटॉक्सने श्री. प्रसून जोशी यांच्यासोबत एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री. प्रसून जोशी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चे सध्याचे अध्यक्ष देखील आहेत 

 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन वेळा जिंकलेल्या श्री. प्रसून जोशी यांनी लिहिलेली अनेक गीते संवाद अतिशय लोकप्रिय आहेत. 'ठंडा मतलब कोका-कोला' यासारखी त्यांची ऍड-कॅम्पेन्स लोकांच्या आठवणींमध्ये अक्षरशः कोरली गेली आहेतयुट्युबवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचे सूत्रसंचालन 'इनाम होल्डिंग्स'चे संचालक श्री. मनीष चोखानी यांनी केले

 

यावेळी श्री. प्रसून जोशी यांनी आपल्या जीवनातील समृद्ध अनुभवांबद्दल आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाविषयी अनेक रोचक गोष्टी सांगितल्या. आपण स्वभावाने अतिशय आशावादी आहोत हे आवर्जून सांगत ते म्हणाले की, "आपण आपला देश आणि आपला समाज यांच्या ताकदीविषयी सतत बोलत राहिले पाहिजे आणि जे चूक आहे त्याबद्दल नुसते बोलण्याऐवजी सुधारणा घडवून आणण्यासाठी काहीतरी करत राहिले पाहिजे."  श्री. जोशी यांनी व्यवसाय, उद्योग आणि जाहिरात क्षेत्राविषयी आपले विचार मांडले. ते म्हणाले, "जो व्यवसाय सामाजिक कल्याणासाठी अनुरूप नसतो आणि जो उद्योग आपल्या कामात समाजाविषयी आपल्या कर्तव्यांना महत्त्वपूर्ण मानत नाही तो अखेरीस संपतो." तसेच पुढे त्यांनी सांगितले, "नीट माहिती घेऊन, विचार करून पर्याय निवडण्याच्या शक्तीवर माझा विश्वास आहे. जाहिरात ही काही लपून किंवा कशाच्या तरी आडून केली जात नाही. जाहिरात तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगत असते की, मी जाहिरात आहे आणि मी अशी आशा करते की तुम्ही माझा विचार कराल. एक जाहिरात म्हणून तुमचे मनोरंजन करण्यासाठी आणि तुमच्या मनात माझे स्थान निर्माण करण्यासाठी मी अतिशयोक्तीचा उपयोग करत आहे."

 श्री. जोशी यांच्याकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या व्यावसायिकांबद्दल त्यांनी सांगितले की, त्यांना व्यावसायिकांबद्दल खूप आपुलकी वाटते. ते म्हणाले की, एखादा उद्योजक एखाद्या संकल्पनेवर किंवा प्रकल्पावर काम का करू इच्छितो त्यामागची गहन कारणे समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. “हेच उद्योजकांच्या सत्याचे मूळ असते."  त्यांनी यावेळी विज्ञान, अध्यात्म आणि सोशल मीडिया या विषयांवर देखील चर्चा केली तसेच जगातून अराजक दूर करण्यासाठी संवाद किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर देखील आपले विचार मांडले. ते म्हणाले की, "मी अनुभूत सत्याच्या दुनियेत जगतो आणि ही दुनिया लौकिक मनाचे एक विचार प्रक्षेपण आहे." नदीचे उदाहरण देत त्यांनी हे समजावून सांगितले, “नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहत असलेल्या व्यक्तीला मिळत असलेला अनुभव हा त्याचवेळी त्याच नदीच्या काठावर उभे राहून ध्यान करत असलेल्या व्यक्तीला मिळत असलेल्या अनुभवापेक्षा वेगळा असतो. किनाऱ्यावर ध्यानस्थ असलेल्या व्यक्तीसाठी ती नदी शांत असते. नदी एकच आहे पण वास्तव वेगवेगळे आहे.”