कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. या संकट काळात अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच अभिनेत्री सनी लियोनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांनी देखील गरजूंना मदत केली.

कोरोना काळात अनेक लोकांवर उपासमारीची वेळ झाली आहे. दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे. गरजुंसाठी सनी लिओनीनं पुढाकार घेतला आहे. सनी लियोनी आणि तिचा पती डेनियल वेबरनं गरजूंना अन्नदान केलंट्रॅकमधून फूड पॅकेट्स वाटतानाचे त्या दोघांचे फोटोज समोर आले आहेत.

आपलं मत व्यक्त करताना सनी लिओनी म्हणाली, 'अशा कठीण परिस्थितीत अनेकांसमोर मोठी चिंता आहे ती म्हणजे, मी माझ्या कुटुंबाला किंवा मुलांना खायला कसं देणार? त्यामुळं अगदी मनापासून मी हे काम करतेय.'

दरम्यान, मिलियन डॉलर व्हेगन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्वयंसेवी संस्था आहे आणि जागतिक स्तरावरही ही मोहीम राबवत आहे. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था मिलियन डॉलर वेगननं कोरोनामुळं ज्या लोकांचे हाल होत आहेत अशा लोकांना थेट मदत करण्यासाठी किमान 100,000 जेवण देण्याचं वचन दिलं आहे.