इंडोनेशियातून खरेदी केलेल्या 100 रुपयांच्या पाम तेलावर भारतीय ग्राहकांना 60 रुपये कर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंडोनेशियातून खरेदी केलेल्या 100 रुपयांच्या पाम तेलावर भारतीय ग्राहकांना 60 रुपये कर

नवी दिल्ली : इंडोनेशियातून भारतात आयात होणाऱ्या पाम तेलाच्या प्रत्येक १०० रुपयांवर ६० रुपयांचा कर भारतीय ग्राहकांना द्यावा लागत आहे. बाजारातील स्थितीनुसार, इंडोनेशियाने क्रूड पाम तेलावर मेमध्ये निर्यात कर वाढवून १०,५४० रु. प्रतिटन केला आहे.

हा एप्रिलमध्ये ८,४९० रु. प्रति टन होता. याशिवाय या वर्षाच्या सुरुवातीस त्याने आपला निर्यात कर ४०२५ रु. प्रतिटनावरून वाढवून १८,६४४ रु. प्रतिटन केला आहे. इंडियन असाेसिएशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसरनुसार, इंडोनेशियात पाम तेलावर कर २९,२८० रु. प्रति टन आहे. यानंतर भारतात त्यावर ३५.७५% कर आणि सेस लावला जातो. ग्राहकांवर हे ओझे आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क परिषदेने अनेक आयात वस्तूंवर लावलेल्या द्विमासिक शुल्कात बदल केला आहे. याअंतर्गत खाद्यतेल, सोने आणि चांदी येते.

क्रूड सोया तेल वगळता प्रमुख खाद्यतेलांचे दर ४१०० रु. प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. कच्च्या पाम तेलाचे भाव ८५,१४० रुपयांवरून ८९,२३९ रु. प्रतिटनापर्यंत वाढवले आहेत. रिफाइंड पाम तेलाचा खर्च ९०,९२७ रु. प्रतिटन पडतो. उद्योगाशी संबंधित सूत्रांनुसार, अनेक भागांत लागलेल्या लॉकडाऊनमुळे तेल उद्योगाचे प्रमाण आणि नफा दोन्हींवर दबावाचा सामना करावा लागत आहे. हॉटेल, रेस्तराँ आणि केटरिंगच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांपर्यंत घट आली आहे. तेल वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताने जवळपास ६३ टन खाद्यतेलाची आयात केली आहे.