मुंबईत आतापर्यंत २९१ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना; नागरिकांचे जीवमुठीत घेऊन वास्तव्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत आतापर्यंत २९१ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना; नागरिकांचे जीवमुठीत घेऊन वास्तव्य

मुंबई : मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड आणि भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील २४ वॉर्डपैकी २१ वॉर्डमध्ये २९१ ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहत आहेत. सध्या मुंबईतील भांडुप, विक्रोळी, साकीनाका, कुर्ला, मलबार हिल या ठिकाणी नेहमीच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या ठिकाणी सर्वाधिक दरडी कोसळल्या आहेत.

मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. तसेच धोकादायक वस्त्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरड कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणे

भांडुप एस१५२

घाटकोपर एन३२

कुर्ला एल१८

ग्रँडरोड , डी विभाग१६

मालाड पी उत्तर११

चेंबूर एम पूर्व११

वरळी जी दक्षिण - १०

हिंदुस्थान समाचार