आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले गौतम अदानी, यावर्षी 33 अब्ज डॉलरने वाढली संपत्ती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले गौतम अदानी, यावर्षी 33 अब्ज डॉलरने वाढली संपत्ती

अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. त्यांची एकूण
मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स आहे. यावर्षी त्यांची संपत्ती 33 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. म्हणजेच जवळपास
100% वाढ झाली. आशियात पहिल्या क्रमांकावर रिलायन्सचे मुकेश अंबानी आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 76.5
अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या बिलिनेयर इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
ज्या प्रकारे गौतम अदाणी सलग पुढे जात आहेत, अशा वेळी ते मुकेश अंबानी यांना पछाडत पुढेही जाऊ शकतात.
या दोघांमधील मालमत्तेत केवळ 10 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. इंफ्रास्ट्रक्चरपासून रिन्यूएबल एनर्जीमध्येही काम
करत असलेल्या गौतम अदाणींनी चीनच्या बेवरेजेस येथून फार्मामध्ये काम करत असलेल्या कंपनीचे मालक झौंग
शानशान यांना मागे टाकले आहे. शानशान यांची संपत्ती 63.6 अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास
अंबानी यावेळी 13 वे श्रीमंत उद्योगपती आहेत तर अदाणी हे 14 व्या क्रमांकावर आहेत.
यावर्षा विषयी बोलायचे झाले तर अंबानींच्या संपत्तीमध्ये 17.5 कोटी डॉलरची घट झाली आहे. तर अदानी यांच्या
संपत्तीत 32.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानींच्या संपत्तीमध्ये गेल्या एका वर्षापासून जबरदस्त तेजी आली
आहे. मे 2020 पासून आतापर्यंत त्यांच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शेअर बाजारात
चढ-उतार झाला, अदानींच्या कंपनींचे शेअर नेहमीच वर राहतात आणि प्रत्येक आठवड्यात एका नव्या भावाचा
विक्रम बनवतात.