ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी केली कोरोनावर मात

मुंबई : 74 वर्षीय जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असून त्यांची काळजी घेतलेल्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.   रणधीर कपूर यांची 29 एप्रिल रोजी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.