अनुष्का शर्माच्या ‘या’ पोस्टवर अर्जुनची भन्नाट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अनुष्का शर्माच्या ‘या’ पोस्टवर अर्जुनची भन्नाट

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकताच तिने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून फक्त चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील तिचे कलाकार मित्रसुद्धा फिदा झाले आहेत. ते या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र अर्जुन कपूरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनुष्का यू के वरून परत येताच एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याला तिने “कोणी तरी पॅक अप असे बोलले का?”, असे कॅप्शन दिलं आहे. यात ती दोन पडद्याच्यामधून येऊन कॅमेराकडे बघत हसताना दिसते आहे. तसंच तिने व्हिडीओसोबत मजेशीर गाणं देखील जोडले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लोक कमेंट करत आहेत. अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री कतरिना कैफ, दिया मिरजा यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. मात्र अनुष्का शर्माचा जवळचा मित्र आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या कमेंटने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.