सैफ अली खानच्या मुलासोबत सुहाना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सैफ अली खानच्या मुलासोबत सुहाना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहानाने अजून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले नाही. तरी देखील तिचे लाखो आहेत. सुहानाने लवकरात लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, आता तिच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, जोया अख्तर इंटरनॅशनल कॉमिक बूक आर्चीवर चित्रपट बनवणार आहे. जोया या कॉमिक बूकच्या हिंदी चित्रपटावर काम करत आहे. त्यासाठी तिची पहिली पसंत ही सुहाना खान आहे. मात्र, सुहाना खान आणि शाहरुख खान यांनी अजून काहीही सांगितले नाही. आर्ची या कॉमिक बूकमध्ये एक मित्राचा ग्रुप असतो आणि ते एकत्र फिरायला जातात. यासोबतच जोया आणखी दोन स्टार किड्सना लॉन्च करणार आहे.

जोयाच्या या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी लेक आणि जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर पण दिसणार आहे. या सोबतच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान देखील दिसणार आहेत. जोया एकावेळी सुहाना, खुशी आणि इब्राहिमला लॉन्च करणार आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या आधी सुहाना ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे.