राज्यात मोठी रुग्णघट; २१,२७३ नवे रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यात मोठी रुग्णघट; २१,२७३ नवे रुग्ण

मुंबई : राज्याचा रुग्णआलेख घसरत असून, गुरुवारी मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत करोनाचे २१,२७३ नवे रुग्ण आढळले असून, ४२५ जणांचा मृत्यू झाला. जवळपास दोन महिन्यांनी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यात सध्या लाख रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४३,८६९ रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत.

दुसरी लाट ओसरू लागलीदेशात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. २४ राज्यांमधील उपचाराधीन रुग्णसंख्याही घटत असून, करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. करोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. मात्र चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणातही गेल्या तीन आठवड्यांपासून घट होत आहे, असे केंद्राने म्हटले आहे.