मिताली- सिद्धार्थ एकत्र, ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मिताली- सिद्धार्थ एकत्र, ‘या’ सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन वाढविणारा चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर अलीकडेच लग्न बंधनात अडकले. मराठी चित्रपटसृष्टीमधील हे सर्वांचे लाडके कपल आहे. पण आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘स्टोरीटेल मराठीया जगविख्यात ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सीरिजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहेत.

हौस हसबंड'(Haus Husband) असं नाव असलेली ही ओरिजनल धम्माल ऑडिओ सीरिजस्टोरीटेल मराठीने तयार करून नवा पायंडा रचला आहे. रोहित आणि रेवाआत्ताच लग्न झालेलं, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं एक कपलएकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या concepts जरा उलट्यापालट्या आहेतपण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंतसगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायततर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेचस्टोरीटेल मराठीचीहौस हसबंड.’