आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली “वाईट परिस्थिती देखील…”

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली “वाईट परिस्थिती देखील…”

जुलै रोजी बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. आमिर आणि किरणने एक स्टेटमेंट जारी करत सहमतीने विभक्त होत असल्याचं सांगितलं आहे. आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यात अभिनेत्री हिना खानने देखील तिचं मत मांडलंय. हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर करत आमिर-किरणच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.

हिना खानने तिच्या इन्स्टा पोस्टला आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाची बातमी शेअर केली होती. यात कॅप्शनमध्ये ती म्हणाली, ” तरीपण आदर….सर्वात चांगलं बनण्यासाठी वाईट परिस्थिती देखील चांगल्या प्रकारे कशी हाताळायची हे शिकायला पाहिजे. तुम्हा दोघांना शुभेच्छाअसं म्हणत हिनाने जरी तिला या बातमीने वाईट वाटलं असलं तरी दोघांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते

दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे. दोघांच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं अनेकांनी आमिर खानला ट्रोल देखील केलं. दंगल गर्ल फातिमा सना शेखसोबत आमिरचं नावं पुन्हा जोडत नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले.