२६ वर्षांनंतर मिलिंद सोमणचा रॅम्प वॉक पाहून अशी होती मलायकाची प्रतिक्रिया

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

२६ वर्षांनंतर मिलिंद सोमणचा रॅम्प वॉक पाहून अशी होती मलायकाची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी देखील मलायकाने स्वत:ला फिट ठेवले आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद सोमण एका इवेंटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे आणि ते पाहून मलायकाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.

मिलिंद सोमणने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद शर्टलेस असून मॉडलिंग करताना दिसत आहे. मिलिंदचा हा लूक मलायका अरोराला प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. तसेच त्याचा रँम वॉक पाहून ‘वाह द लूक’ असे मलायका ओरडताना दिसत आहे. हा व्हिडीओ ९ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मिलिंदने ‘जवळपास २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

मलायका आणि मिलिंद हे दोघेही सध्या ‘मॉडल ऑफ द इअर’ सिझन २ मध्ये एकत्र दिसत आहेत. मिलिंदचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ या शोमधील असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी देखील मिलिंद आणि मलायकाने अनेक शोमध्ये एकत्र काम केले आहे.