मर्सिडीझ-बेंझच्या अल्ट्रा-लक्झरियस 'मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक' चे भारतात पदार्पण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मर्सिडीझ-बेंझच्या अल्ट्रा-लक्झरियस 'मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक' चे भारतात पदार्पण

पुणे : देशातील सर्वात मोठी लक्झरी गाड्यांची कंपनी मर्सिडीझ-बेंझने मेबॅच श्रेणीतील पहिल्या एसयुव्हीसोबत अल्ट्रा-लक्झरियस एसयुव्ही विभागात पाऊल ठेवले आहे. शानदार अनोख्या वैशिष्ट्यांसह, मर्सिडीझ-मेबॅच 'अल्टिमेट लक्झरी' अर्थात सर्वोत्तम शान आराम सर्वात आधुनिक अस्सल रूपात प्रस्तुत करते. 'मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक' भारतात लक्झरी एसयुव्ही विभागात संपूर्णपणे नवा मापदंड स्थापित करत आहे. अतिशय सुंदर आणि शानदार वैशिष्ट्यांनी सुविधांनी परिपूर्ण अशी ही कार अतुलनीय आहे

पहिली मेबॅच एसयुव्ही असण्याबरोबरीनेच जीएलएस मेबॅच ६०० हे भारतीय बाजारपेठेत आणले जात असलेले, मर्सिडीझ-मेबॅच एस-क्लासनंतरचे दुसरे मेबॅच मॉडेल आहे. ऑटोमोटीव्ह इंजिनीयरिंग, सेवा आणि ऍक्सेसरीजमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनोखी लक्झरी आणि जास्तीत जास्त आराम यांचे दुसरे नाव म्हणजे मर्सिडीझ-मेबॅच ब्रँड

एकमेवाद्वितीय अल्ट्रा-लक्झरी एसयुव्ही भारतात लॉन्च करण्याबाबत मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, "मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक भारतात दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मेबॅच ब्रँड उत्कृष्ट लक्झरीचे प्रातिनिधीत्व करतो आणि ही एसयुव्ही ग्राहकांना मिळणारा अनुभव अविश्वसनीय स्तरापर्यंत वाढवते. आधीच्या काळातील अभिजात मोहकता आणि सर्वात जास्त आराम यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत मेळ घालत कारच्या लक्झरी अनुभवाची नवी व्याख्या ही एसयुव्ही सादर करत आहे. मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक आणून आम्ही भारतात एसयुव्हीसोबत लक्झरी मोटारींगचा संपूर्णतः नवा अनुभव सादर करत आहोत. हे शानदार मॉडेल ज्यांना विशेष आवडले अशा उंची आवड समज असणाऱ्या, चोखंदळ ग्राहकांना ही एसयुव्ही सुपूर्द करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे." 

 श्वेन्क यांनी पुढे सांगितले, "आमच्या उत्पादनांना खूप चांगली मागणी मिळत आहे, त्यावरून आम्ही समजू शकतो की, आमच्या ग्राहकांच्या आशा आणि महत्त्वाकांक्षा प्रबळ आहेत. आता देशात अनेक बाजारपेठा खुल्या होत आहेत आणि आम्ही देखील ग्राहकांकडून दर्शवल्या जात असलेल्या सकारात्मकतेसह आमच्या व्यवसायाला टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरुवात करत आहोत. आमचे २०२१ चे उत्पादन धोरण योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि आम्हाला आशा आहे की मागणीमध्ये, खासकरून टॉप-एन्ड उत्पादनांच्या मागणीमध्ये अधिक जास्त वाढ होत राहील. सध्या बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि आम्ही पूर्ण उत्साहानिशी पुढे जात आहोत. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक नवी उत्पादने सादर करत राहू."