अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

छोट्या पद्यावरील ऐतिहासिक मालिकांना प्रेक्षकांची कायमच पसंती मिळताना दिसते. अशीच एक शूरवीरांच्या शौर्यांची गाथा स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहवर २६ जुलै पासून सुरु होणाऱ्याजय भवानी जय शिवाजीमालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे.
विशेष म्हणजे या मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार आपल्या दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. या मालिकेत अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते खुपच उत्सुक आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य देव म्हणाले, ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. ” असं ते म्हणाले.

या भूमिकेसाठी लागणाऱ्या फिटनेट बाबतीत सांगताना ते म्हणाले, “या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीच मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे. ”