सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’चा ट्रेलर प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असणारा चित्रपट ‘भूत पोलीस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सैफ अली खानला एका वेगळ्या भूमिकेत पाहाण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

२ मिनिट ५० सेकंदाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला सैफ आणि अर्जुनची धमाकेदार एण्ट्री पाहायला मिळते. त्या दोघांसोबतच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम देखील चित्रपटात झळकणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये सैफ आणि अर्जुन हे एकमेकांच्या पूर्णपणे उलट दाखवले आहेत. सैफ हा सतत मजा मस्ती करणारा तर अर्जुन हा सतत पुस्तकातील गोष्टींचा अभ्यास करताना दिसत आहे.

भूत पोलीस’ या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर आतापर्यंत ४ लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली होती. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १७ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘भूत पोलीस’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.