कर्जवसुलीसाठी माल्याची संपत्ती विकण्यास परवानगी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कर्जवसुलीसाठी माल्याची संपत्ती विकण्यास परवानगी

मुंबई, : भारतीय बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून फरार झालेल्या विजय माल्ल्याला विशेष न्यायालयाने मोठा
दणका दिला आहे. ईडीने जप्त केलेली त्याची सुमारे 5646 कोटींची संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास
न्यायालयाने बँकांना परवानगी दिली आहे. 
विजय माल्ल्याला कर्ज देणा-या बँकांनी 5600 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी डीआरटीकडे दाद मागितली होती. याची
गंभीर दखल घेत विशेष न्यायालयाने मल्ल्याच्या जप्त संपत्तीपैकी 5600 कोटींची संपत्ती बँकांकडे सोपवण्यास
तसेच बँकांना ही संपत्ती विकण्यास मुभा दिली आहे. या निर्णयामुळे मल्ल्याकडील कर्ज वसूल करण्यासाठी बँकांना
मल्ल्याची संपत्ती विकता येणार आहे. एसबीआयच्या नेतृत्वात 17 बँकांच्या कन्सोर्टियमने विजय मल्ल्याला 9
हजार कोटींचे कर्ज दिले होते. आता या कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी विजय माल्ल्याच्या संपत्तीवर कारवाई
करण्यात येणार आहे. न्यायालयाने 24 मे रोजी 4233 कोटी रूपये आणि 1 जून रोजी 1411 कोटी रूपयांची प्रॉपर्टी
देण्याचे आदेश दिले होते. पण आता विजय माल्ल्याची संपत्ती विकून थकीत कर्ज वसूल करण्यास परवानगी सत्र
न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने दिली आहे.