२० हजार लस उपलब्ध असूनही लसीकरण केंद्र रिकामे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

२० हजार लस उपलब्ध असूनही लसीकरण केंद्र रिकामे

भंडारा : राज्यात कोरोना लसीकरण अनेक जिल्ह्यात बंद असून भंडारा जिल्ह्यात मात्र उलट परिस्थिती आहे, भंडारा जिल्ह्यात २० हजार लसी उपलब्ध आहेत, लसीकरण सुरळीत सुरु असून सुद्धा नागरिक मात्र लसीकरण करण्यासाठी येत नसल्याने भंडारा जिल्हा प्रशासनावर लस घेता का लस अशी वेळ आली आहे, कोरोना मुळे संपूर्ण जग हादरून गेला आहे, यंदा महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे, राज्यात कोरोनाची दुसरी लाट इतकी भयाव आहे कि ऑक्सिजन अभावी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, या कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी कोरोनानी अक्षरश थैमान घातला आहे, या कोरोनाला रोखण्यासाठी देशात कोरोना लस दिली जात आहे, लस लावण्यासाठी अनेक जिल्ह्यात नागरिकांनी लसीकरण लावण्यासाठी गर्दी केली आहे, मात्र लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे, अनेक जिल्ह्यात लसीकरण केंद्र बंद आहेत , मात्र भंडारा जिल्ह्यात उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे, भंडारा जिल्ह्यात २० हजार लसी उपलब्ध असून १८-४४ व ४५ वयोगटा वरील नागरिकांना लस दिली जात आहे, तरी सुद्धा लसीकरण केंद्रांवर नागरिक येत नाही त्यामुळे लसीकरण केंद्रांवर कर्मचारी नागरिकांची वाट पाहताना दिसत आहेत, जिल्ह्यात आता पर्यंत २ लाख लोकांना लसीकरण झाला असून आता लोकांनी लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करावे असे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे, भंडारा जिल्ह्यात २० हजार कोरोना लस उपलब्ध असून जिल्हा प्रशासना मार्फत गावोगावी जाऊन नागरिकांना लसीकरण केले जात आहे, मात्र लसीमुळे शरीरावर दुषपरिणाम होत असल्याचे समाज नागरिकांमध्ये असल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिक येत नाही त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाला पुन्हा लसीकरण करिता लस घेता का लस बोलण्याची वेळ आली आहे.