विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करा - नवाब मलिक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करा - नवाब मलिक

मुंबई :- ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विना डिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे

 

 दरम्यान रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार लोकांना सल्ला देवू शकतात मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले. केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गंभीरतेने घेण्याची गरज आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिनना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पध्दतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनवण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. रामदेवबाबा डॉक्टर नाही. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री घेतलेली नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काही विधाने करत आहेत. अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास...अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक आहे असेही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान रामदेव बाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्य मंत्री जातात त्यापेक्षा दुर्दैवी घटना होवू शकत नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे