कोरोना संकटात परिचारिका अग्रस्थ योद्ध्या : उपराष्ट्रपती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना संकटात परिचारिका अग्रस्थ योद्ध्या : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  जागतिक परिचारिका दिनानिमित्त  उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष  एम. व्यंकय्या नायडूंनी  देशातील परिचारिका आणि आरोग्य सहकाऱ्यांच्या कार्याचे स्मरण केले. 

ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले, "जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व  परिचारिका भगिनी आणि स्वास्थ्य- आरोग्य सहकाऱ्यांचे विनम्र अभिनंदन  करतो. महामारीच्या या काळात आपण सर्व रोगींवर उपचार करण्यात अग्रस्थ योद्धा म्हणून तत्पर आहात. तुम्ही सर्व सुरक्षित असावे हीच कामना करतो. कृतज्ञ समाज आपल्या त्यागाचा सदैव सम्मान करेल."