आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकांवर प्रवेश; कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकांवर प्रवेश; कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय

सिंधुदुर्ग : कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून तपासणीसाठी प्रत्येक स्थानकात पोलिस व आरोग्य यंत्रणा सज्ज असणार आहे. तर आरक्षण असलेल्या प्रवाशांनी सुद्धा तपासणीसाठी नियोजित वेळेपूर्वीच उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. आता दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात गर्दी होऊ नये यासाठी केवळ आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाला चाकरमान्यांनी सहकार्य करावे, तसेच रेल्वेच्या नियोजित वेळेपूर्वीच तपासणीसाठी स्थानकात उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.