मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही- बीएमसी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही- बीएमसी

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुंबईला धोका नाही, असा दावा मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरीही त्यांची लसीकरण मोहीम चांगली सुरू आहे. शहरातील ४२ लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर ८२ लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरू असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरू आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही.सध्या मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या २,५८६ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ३,९४२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात वकील धृती कापडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी