सलमान खानच्या ‘अंतिम’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सलमान खानच्या ‘अंतिम’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी चित्रपटअंतिम: फाइनल ट्रुथसध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सलमानचा आगळावेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे.

सलमान खानच्याअंतिम: फाइनल ट्रुथया चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अंतिम: फाइनल ट्रुथहा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सलमान आणि आयुष दोघेही पाहायला मिळत आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत असल्याने ही लढाई अंतिम असेल, असे यावरुन स्पष्ट दिसत आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरवरुन दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक हे पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गँगस्टर यांच्या आसपास फिरत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर फक्त चित्रपटाचे नाव लिहिले असूनलवकरचअसे लिहिले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट कधी रिलीज होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानच्याअंतिम: फाइनल ट्रुथया चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे.

अंतिम: फाइनल ट्रुथचित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: फाइनल ट्रुथहा चित्रपट मराठी हिट चित्रपटमुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.