‘कुमकुम भाग्य’मध्ये सेकंड लीडमध्ये झळकलेली मृणाल ठाकूर कशी बनली बॉलिवूडमधील अभिनेत्री?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘कुमकुम भाग्य’मध्ये सेकंड लीडमध्ये झळकलेली मृणाल ठाकूर कशी बनली बॉलिवूडमधील अभिनेत्री?

फरहान अख्तर स्टारर ‘तूफान’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय आणि प्रेक्षकांनी त्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. समीक्षकांनी सुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलंय. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तरसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर ही सुद्धा झळकलीय. या चित्रपटात फरहानसोबतच अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या अभिनयाला सुद्धा प्रेक्षकांकडून दाद मिळतेय. मृणाल ठाकूरला ‘सुपर 30’ या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात ती अभिनेता ह्रतिक रोशनसोबत दिसून आली. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मृणाल ठाकूर एकेकाळी टीव्ही मालिकांमध्ये काम करत होती.

अभिनेत्री मृणाल ठाकूर यापूर्वी टीव्हीवरची लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये बुलबुल अरोरा बनून घराघरात पोहोचली होती. या मालिकेत ती सेकंड लीड रोलमध्ये दिसून आली होती. त्याच्याही पूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती, त्यावेळी ‘मुझसे कुछ कहती है खामोशियां’ या मालिकेत तिने काम केलं होतं. या मालिकेनंतर सुद्धा तिने बऱ्याच मालिकांमध्ये अभिनय केला होता. पण ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतून तिला खरी प्रसिद्धी मिळाली आणि याच मालिकेतलं काम पाहून तिला बॉलिवूडसाठी ऑफर मिळाली. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘सुपर ३०’ या चित्रपटानंतर ती अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ या चित्रपटातून झळकली. याशिवाय लवकरच तिच्या आणखी एक चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार असून ‘आंख मिचौली’ असं त्या चित्रपटाचं नाव असणार आहे. त्याचप्रमाणे ईशान खट्टरसोबत ‘पिप्पा’ या चित्रपटात सुद्धा ती काम करणार आहेत. एका मालिकेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी काही सोपा नव्हता. एका मुलाखतीत बोलताना तिने तिच्या प्रवासाचा आलेख उलगडला होता. यावेळी तिने डेब्यू फिल्म कशी मिळाली होती, हे देखील सांगितलं होतं. यावेळी मृणाल म्हणाली, “मी आधी एक इंटरनॅशनल फिल्म ‘लव सोनिया’मध्ये काम केलं होतं. हा चित्रपट कित्येक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुद्धा दाखवण्यात आला होता. या चित्रपटातून मला पुढच्या चित्रपटाच्या ऑडिशन्ससाठी संधी मिळाली. जेव्हा तुमच्या पाठीशी कोणताही गॉफादर नसतो त्यावेळी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. त्यावेळी माझ्या मनात खूप भीती होती….पण मी काम करत राहिले…मी स्क्रीन स्पेसपेक्षा चांगल्या दर्जाच्या कथेवर लक्ष केंद्रित केलं”.