मंबईत मान्सूनच्या सरी बरसणार!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मंबईत मान्सूनच्या सरी बरसणार!

मंबई : गेल्या चार महिन्यांपासून मुंबईकरांना उन्हाळ्याचा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागलत आहे. मात्र, आता मुंबईकरांना यातून दिलासा मिळणार आहे. कारण आज (मंगळवार) किंवा उद्या जून रोजी मुंबईत मान्सूनचं आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वीच म्हणजे  जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, मुंबईकरांना अजूनही मान्सूनची प्रतिक्षा असून आज किंवा उद्या मुंबईकरांना मान्सूनचं स्वागत करता येणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासाठी अनुकूल असं वातावरण आता निर्माण झाल्याचं देखील कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, नैऋत्य मोसमीव वारे लवकरच मुंबईसह महाराष्ट्राच्या उरलेल्या भागात, तेलंगणामध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये मार्गक्रमण करतील. त्याशिवाय ओडिशाचा काही भाग आणि पश्चिम बंगालमध्ये देखील काही भागांमध्ये येत्या ते दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, पश्चिमेकडच्या वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.