विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंह’ने वळवला ओटीटीकडे मोर्चा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंह’ने वळवला ओटीटीकडे मोर्चा

अभिनेता विकी कौशलच्या आगामीसरदार उधमसिंहसिनेमाने आता ओटीटीकडे पाऊल टाकले आहे. चित्रपटाचे शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनचे काम गेल्या वर्षीच पूर्ण झाले होते. खरं तर हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे तसे होऊ शकले नाही. यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांनी याच वर्षी 15 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर निर्मात्यांनी हा सिनेमा आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या वर्षी ऑगस्टमध्ये महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेड विश्लेषक अरुण मोहन सांगतात, शूजित सरकारने आपलागुलाबो सिताबोदेखील ओटीटीवर रिलीज केला होता. असे करणारे ते पहिले दिग्दर्शक ठरले. त्यांनीच थिएटरमध्ये मोठ्या सिनेमांच्या प्रदर्शनाची चेन मोडली होती. त्यांचे हे डिजिटल वळण आमच्यासाठी फायद्याचे ठरले. अशात त्यांनीसरदार उधम सिंहडिजिटलवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला असेल तर विचार करूनच घेतला असेल. गेल्या दोन वर्षांपासून टीम या सिनेमावर काम करत आहे. गेल्यावर्षीच तो प्रदर्शित होणार होता, मात्र तसे झाले नाही. आजची परिस्थिती पाहता पुढचे 6 महिन्यांपर्यंतदेखील थिएटर उघडण्याचे काही संकेत दिसत नाहीत. आपली गुंतवणूक पाहता निर्मात्यांचे जास्त वाट योग्य नाही.