करोना मृत्युदरात १.७ टक्क्यांपर्यंत घट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोना मृत्युदरात १.७ टक्क्यांपर्यंत घट

पुणे : करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने रुग्णसंख्येबरोबरच मृत्युदरही कमी झाला आहे. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मृत्युदर गेल्या सहा आठवडय़ांच्या तुलनेत . टक्क्यांपर्यंत घटला आहे. तसेच गेल्या सहा आठवडय़ांतील साप्ताहिक बाधितांचा दर . टक्क्यांवर स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या सहा आठवडय़ांचा विचार करता जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ते जून या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मृत्युदर तीन टक्क्यांवर गेला होता. त्या आधीच्या दोन आठवडय़ांतही शहरासह जिल्ह्य़ातील मृत्युदर तीन टक्क्यांच्या आसपासच होता. मात्र, १० जूनपासून आतापर्यंत साप्ताहिक मृत्युदर . टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

दरम्यान, संसर्गाची दुसरी लाट जूनच्या सुरुवातीपासून उतरणीला लागली आहे. जूनच्या सुरुवातीपासून आतापर्यंत साप्ताहिक बाधितांचा दर सहा टक्क्यांमध्येच असून त्यापेक्षा जास्त झालेला नाही, ही बाब शहरासह जिल्ह्य़ासाठी दिलासा देणारी ठरली आहे. २० ते २६ मे या कालावधीत शहरासह जिल्ह्य़ातील बाधितांचा दर ११. टक्के  होता. २७ मे ते जून या सात दिवसांत . टक्के , ते जून या कालावधीत . टक्के , १० ते १६ जून या काळात . टक्के , १७ ते २३ जून या काळात . टक्के  आणि २४ ते ३० जून या कालावधीत . टक्के  बाधितांचा दर होता, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.