सर्वाना एकत्रित ठेवण्यासाठी कर्णधार म्हणून बांधिल -धवन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सर्वाना एकत्रित ठेवण्यासाठी कर्णधार म्हणून बांधिल -धवन

संघातील सर्व खेळाडूंना एकत्रित आणि आनंदी राखण्यासाठी कर्णधार म्हणून बांधिल असेन, अशी प्रतिक्रिया शिखर धवनने व्यक्त केली. डावखुरा  सलामीवीर धवनकडे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या दोन मालिका खेळणार आहे. ‘‘भारतीय संघाचे कर्णधारपद लाभणे, हे माझ्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश आहे. कर्णधार म्हणून प्रत्येकाला एकत्रित आणि आनंदित राखणे, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे,’’ असे धवनने सांगितले.

या मालिकेत मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणारे महान फलंदाज राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असे धवनने सांगितले. ‘‘माझे राहुल यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते खेळाडू असताना मी त्यांच्याविरुद्धही खेळलो होतो. भारतसंघाचे ते प्रशिक्षक असताना मी कर्णधार होतो. त्यामुळे रणनीतीबाबत त्यांचे नियमित मार्गदर्शन मिळायचे,’’ असे धवनने सांगितले.