सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं”; मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सर्वसामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरावं”; मुख्यमंत्र्यांचं राज्यातल्या डॉक्टरांना आवाहन

मुंबई : आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टरांनी मुंबईतल्या ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांना कोरोनाबाबतीतल्या वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अनेक शंकांचं निरसन केलं. आत्तापर्यंत मुंबईतल्या एक हजार डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाचं वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रितीने राज्यातल्या इतर विभागातल्या डॉक्टरांशीही संवाद साधण्यात येणार आहे.

या उपक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्र करत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसंच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण माझा डॉक्टरबनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे.

घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.