एका दिवसात मिळाले ८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एका दिवसात मिळाले ८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री निधि अग्रवालच्या रोमॅण्टिक केमेस्ट्रीने भरलेलंसाथ क्या निभाओगेहे गाणं अखेर रिलीज झालंय. अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचं रीक्रिएटेड वर्जन असलेलंसाथ क्या निभाओगेसॉंग रिलीज होताच गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या गाण्याने प्रेक्षकांच्या ९० च्या दशकातील जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सोनू सूदच्या या गाण्यासाठी त्याचे फॅन्स बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. या गाण्याने युट्यूबवर लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केलाय.

सोनू सूदच्या या गाण्यात खूपच इंटरेस्टिंग आणि खास एलिमेंट दिसून आले. दिग्दर्शक फराह खान हिने या गाण्याची कोरिओग्राफी आणि डायरेक्शन केलंय. पंजाबच्या हिरवाईत शूट केलेल्या या गाण्यात प्रेमींची कहाणी दाखवण्यात आलीय. या गाण्यात सोनू सूदने एका शेतकऱ्याची भूमिका साकारलीय, जो पुढे जाऊन एक पोलिस अधिकारी बनत असतो.

 

फराह खान दिग्दर्शित या गाण्यात एक देसी लव्हस्टोरी दाखवण्यात आलीय. गाण्याच्या सुरूवातीला सोनू सूद एका पोलिस अधिकाऱ्याच्या वेशभूषेत दिसतो. सोनू सूद एका आरोपीला पकडण्यासाठी गेला असताना त्या ठिकाणी निधिची भेट होते. ही भेट त्यांची खूप वर्षानंतरची असते. खूप वर्षानंतर एकमेकांना पाहून त्या दोघांच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. त्यानंतर गाणं फ्लॅशबॅकमध्ये जातं. गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये सोनू सूद आणि निधि यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. सोनू निधिला प्रपोज करण्यासाठी तिच्या घरी जातो, पण त्यानंतर असं काही घडतं की ते दोघे वेगळे होतात. पण इतक्या वर्षानंतर झालेल्या भेटीनंतर मात्र ते दोघे पुन्हा एकत्र येतात, असा हॅपी एन्डींग दाखवण्यात आलाय. या गाण्यातला शुद्ध देसी रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडला.