राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रजनीकांत यांची आणखी एक मोठी घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रजनीकांत यांची आणखी एक मोठी घोषणा

सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशावरुन चांगल्याच चर्चा रंगत आहे. राजकीय विश्लेषकांसह त्यांच्या चाहत्यांमधूनही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र आता या चर्चांना, तर्क-वितर्कांना पूर्णविराम लागला आहे. रजनीकांत यांनी राजकारण प्रवेशाबाबतचा आपला निर्णय एका स्टेटमेंटद्वारे जाहीर केला आहे. राजकारणात येण्याचा आपला कसलाही विचार नाही, असं त्यांनी या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

रजनी मक्कल मंद्रम या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असं रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केलं आहे. तसंच आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रजनीकांत यांची रजनी मक्कल मंद्रम ही संघटना रजनीकांत नरपनी मंद्रममध्ये किंवा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठीच्या संघटनेत विलीन होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

या बैठकीच्या आधी रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज होणाऱ्या या बैठकीत माझ्या राजकारण प्रवेशाबद्दल तसंच संघटनेच्या प्रश्नांबद्दल चर्चा होईल.निवडणुका, करोना, चित्रीकरण आणि माझी तब्येत या सगळ्यामुळे मी सदस्यांना भेटू शकलो नव्हतो. पण आता मी त्यांची भेट घेईल आणि निर्णय घेईन.