‘शेरशाह’चा टीझर प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘शेरशाह’चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट शेरशाहमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे.

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणार आहे. शेरशहा ही शौर्य, प्रेम आणि त्यागाची कहाणी आहे. कॅप्टन विक्रम बत्रा (पीव्हीसी) यांच्या जीवनपटावरून प्रेरणा घेत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या पराक्रमाची गाथा उलगडण्यात आली असून १९९९ सालातील कारगीलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यात येत आहे. आपलेशेरशाहहे नाव सार्थ करत कॅप्टन बत्रा यांनी दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते

विष्णू वर्धन यांचे दिग्दर्शन आणि धर्मा प्रोडक्शन्स काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेलाशेरशाहहा बॉलीवूडचा या वर्षातील सर्वात मोठा युद्ध नाट्य चित्रपट असणार आहे. हा चित्रपट भारत आणि जगभरातील २४०+ देशांमध्ये १२ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.