भारताच्या सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राची अजून एक मोठी कामगिरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताच्या सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राची अजून एक मोठी कामगिरी

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. नीरजची गुणसंख्या १३१५ असून जर्मनीचा जोहान्स १३९६ गुणांसहित पहिल्या क्रमांकावर आहे.

नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकच्या फायलनमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. नीरज चोप्राच्या सुवर्णपदकामुळे भारताने ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने एकूण सात पदकं जिंकली. मायदेशी परतल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नीरज चोप्राने यावेळी एनडीटीव्हीशी बोलताना हे यश डोक्यात जाऊ देणार नाही असं म्हटलं. “माझं संपूर्ण लक्ष माझ्या खेळावर होतं. जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर स्पॉन्सर आणि पैसा मिळत राहतो. गरजूंसाठी हे पैसे खर्च करण्याची माझी इच्छा आहे. खेळावर लक्ष केंद्रीत करणं आण यश डोक्यात जाऊ न देणं या महत्वाच्या गोष्टी आहेत,” असं नीरज चोप्राने म्हटलं आहे.