संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लॉईड ऑस्टिन यांच्यात विविध विषयांवर चर्चा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लॉईड ऑस्टिन यांच्यात विविध विषयांवर चर्चा

नवी दिल्ली: जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी सोमवारी संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दूरध्वनी करीत संपर्क साधला. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानमधील घडामोडींसह द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी संरक्षण सहकार्याबाबत चर्चा केली आणि एकत्रितपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
संरक्षण मंत्री आणि ऑस्टिन यांनी प्रदेशातील दहशतवादाचा सामना करण्याबाबत एकमेकांचे मत जाणून घेतले. उभय नेत्यांनी अफगाणिस्तानमध्ये अलिकडेच नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या कार्यात परस्पर सहकार्याची प्रशंसा केली आणि बदलत्या परिस्थितीमुळे नियमित संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली .