उपराष्ट्रपतींच्या विचारांनी कार्याची प्रेरणा मिळते : खुशबू सुंदर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उपराष्ट्रपतींच्या विचारांनी कार्याची प्रेरणा मिळते : खुशबू सुंदर

नवी दिल्ली, :  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी मुखकवच आणि सामाजिक अंतराचे पालन करीत विविध विषयांवर चर्चा केली. खुशबू सुंदर यांनी पारंपरिक हातमाग वस्त्र देऊन उपराष्ट्रपती नायडूंचे अभिवादन केले.
या संदर्भात ट्वीटर द्वारे माहिती देताना खुशबू सुंदर म्हणाल्या, " दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सदिच्छा भेट घेतल्यावर अत्यंत गौरवपूर्ण वाटले. आपल्या अमूल्य वेळ आणि विचारांसाठी धन्यवाद. आपले विचार ऐकून मला आणखी कार्य करण्याची प्रेरणा प्राप्त होते. आपली नम्रता आणि साधेपण पाहून मी गदगद आहे… वंदन. " अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.