कोरोना बाधितांच्या संख्येने गाठला सुमारे दोन महिन्यातला नीचांक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना बाधितांच्या संख्येने गाठला सुमारे दोन महिन्यातला नीचांक

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतात गेल्या 24 तासांच्या कालावधीत दैनंदिन पातळीवरील सुमारे दोन महिन्यांत सर्वात कमी म्हणजे 1,20,529 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. यामुळे गेले सलग 9 दिवस देशातील दैनंदिन पातळीवर 2 लाखांहून कमी नव्या कोविड बाधितांची नोंद होत आहे. केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या आज 15,55,248 इतकी आहे. सलग पाचव्या दिवशी ही रुग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे.गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 80,745 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 5.42% इतकी आहे. भारतात सलग 23 व्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 1,97,894 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या 77,365 ने अधिक होती.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,67,95,549 व्यक्ती कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 1,97,894 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 93.38% झाला असून या दराचा चढता कल दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग निश्चित करण्यासाठी एकूण 20,84,421 चाचण्या झाल्या आहेत आणि भारताने आतापर्यंत एकूण 36.1 कोटीहून अधिक (36,11,74,142) चाचण्या केल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढविले असतानाच दुसरीकडे साप्ताहिक पातळीवर पॉझिटीव्हिटी दरातील घसरण सुरु असल्याचे दिसते आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.89% असून दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर  5.78% इतका आहे. हा दर सलग 12 व्या दिवशी 10% हून कमी राहिला आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 22 कोटी 78 लाखांहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसीच्या 36,50,080 मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसारदेशात 32,00,677 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 22,78,60,317 मात्रा देण्यात आल्या आहेत.