टीम इंडियाचा श्रीलंका दौरा संकटात!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा संकटात!

मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताला यावर्षी जुलैमध्ये श्रीलंका दौरा करायचा आहे. मात्र श्रीलंकेतील करोनाच्या वाढत्या घटनेने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या संकटात आणखी भर पडली आहे. श्रीलंकेत मंगळवारी केवळ २५६८ करोनाची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, नवीन प्रकरणांपैकी ३८ लोक परदेशातून आले आहेत. त्यामुळे या दौऱ्यावरही काळे ढग दाटले आहेत.

कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियम भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सर्व मर्यादित षटकांच्या सामन्यांचे आयोजन करेल. श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) प्रशासकीय समितीचे अध्यक्ष अर्जुन डी सिल्वा म्हणाले, “संपूर्ण मालिका एकाच ठिकाणी घेण्याची आमची योजना आहे. आर प्रेमदासा स्टेडियम या सामन्यांचे आयोजन करणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

भारतीय संघ ५ जुलैला श्रीलंका येथे पोहोचेल आणि त्यानंतर एक आठवडा क्वारंटाइन राहील. या कालावधीनंतर दोन्ही संघांमध्ये १३ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर २२ जुलैपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल.

डी सिल्वा म्हणाले, “अर्थातच त्या वेळी परिस्थिती कशी असेल यावरदेखील हे अवलंबून आहे. करोनामुळे चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जातील.