वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या ३४७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या ३४७ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या ३४७ व्या पुण्यतिथीनिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बाजार उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी आज १७ जून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन - १९९३ पासून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान - प्राणिसंग्रहालयात तिथीप्रमाणे येणाऱ्या पुण्यतिथीदिनी वीरमाता जिजाबाई भोसले यांना अभिवादन करण्यात येते. १७ जून, १६७४ रोजी (ज्येष्ठ वद्य नवमी) किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी वीरमाता जिजाबाई भोसले यांचे निधन झाले.