गायिका सावनी रवींद्रने दिली गुड न्यूज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गायिका सावनी रवींद्रने दिली गुड न्यूज

गायिका सावनी रवींद्रच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. सावनीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गूड न्यूज ऐकून चाहत्यांनी सावनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बाळाचा फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वी सावनीने पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबतचे फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली होती. तिने डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता सावनीने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचे समोर आले आहे.

सावनीने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. अंगाईगीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी या आधी गायली होती. पण आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते. कारण ती आई होऊ शकते. सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहेअशा भावना व्यक्त केल्या होत्या. आता तिला कन्यारत्न प्राप्त झाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.