अकोल्यात वादळी पावसाचा तडाखा; एकाचा वीज पडून मृत्यु

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अकोल्यात वादळी पावसाचा तडाखा; एकाचा वीज पडून मृत्यु

अकोला, 9 मे(हिं..)हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार काही दिवसांपासून हवामानात बदल होत आहे. त्यामुळे वादळीवाऱ्यासह पाऊस काही ठिकाणी विज पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार आज 9 मे रविवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास पातुर तालुक्यातील आलेगाव परिसरात तुफानी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे विजांचा कडकडाट होऊन आलेगाव येथील एका 65 वर्षीय तोताराम अमृता नवलकार नामक वयोवृद्ध शेतकरी शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेला असता अंगावर विज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हवामान विभागाने जिल्ह्यात 7 मे ते 10 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह वीज पडण्याचा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी दिला होता. रविवारी पातुर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये दुपारी 4 वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला या जोरदार वादळी वाऱ्यामुळे लोक सैरावैरा पळायला लागले सुरक्षित जागा शोधू लागले. काही वेळातच या वादळाने उग्र।रुप धारण करीत विजांचा कडकडाट जोरात व्हायला लागला. अशातच आलेगाव परिसरात बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या आलेगाव येथील तोताराम अमृता नवलकार 65 वर्ष या शेतकऱ्याचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चांनी पोलीसांनी घटनास्थळ गाठीत घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या वादळी वाऱ्यांच्या थैमानाने शेतकऱ्यांचे आंबा, कांदा भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुध्दा वादळीवायासह पाऊस विजांचा कडकडाट झाल्याचे वृत्त असून अकोला तालुक्यातील आपातापा येथे तुरळक वादळीवाऱ्यासह पाऊस तर म्हैसांग येथे मुसळधार पाऊस झाला असून परीसरातील विरवाडा काही भागांमध्ये वादळीवायासह पाऊस झाल्याचे समजते तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.अन्य काही घटना घडल्या चे सद्यातरी वृत्त नाही.