मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला

मुंबई : शहरातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून रुग्ण दुपटीचा कालावधीही 145 दिवसांवर घसरला आहे. महिन्याभरापूर्वी हा कालावधी 35 दिवस इतका होता. शहरात शनिवारी 2,678रुग्ण आढळले, तर 62 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्यावाढीचा दरही गेल्या आठवड्यापासून घटू लागला आहे.

ठाणे जिल्ह्यात 1,966 बाधित

जिल्ह्यात शनिवारी 1,966 नवे रुग्ण आढळले, तर 68 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात झाले. 24 तासांतील बाधितांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 533, ठाणे 479, ठाणे ग्रामीण 241, नवी मुंबई 239, मीरा-भाईंदर 225, बदलापूर 97, अंबरनाथ 70, उल्हासनगर 70 आणि भिवंडीतील 12 रुग्णांचा समावेश आहे.