विजय मल्ल्याच्या मुंबईतील ‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विजय मल्ल्याच्या मुंबईतील ‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव

फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या मुंबईतील सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय म्हणजेच किंगफिशर हाऊस लिलावात विकले गेले आहे. हे घर हैदराबादस्थित सॅटर्न रियल्टर्सने ५२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. ही किंमत या घराच्या राखीव किंमत १३५ कोटींपेक्षा एक तृतीयांश आहे. २०१९ मध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील किंगफिशर हाऊसचा आठव्यांदा लिलाव करण्यात आला होता. पण त्याला कोणीच घेतलं नाही. त्याची ओरिजनल किंमत १५० कोटी होती. डेट रिकव्हरी टर्ब्युनलकडून त्या घराचा लिलाव करण्यात आला होता.

या लिलावातून जे पैसे येणार होते, ते गुंतवणुकदारांना मिळणार होते. आतापर्यंत माल्याची प्रॉपर्टी विकून ७५२० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरम्यान, बँकांच्या एका संघाचे माल्याकडे एकूण १० हजार कोटी रुपये थकीत आहेत. या संघाची प्रमुख बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. लंडन हायकोर्टाने जुलै महिन्यात दिवाळखोर घोषित केलं होतं. त्यामुळे भारतातील बँका त्याच्या संपत्तीवर कब्जा करू शकतात तसेच त्या विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात.

किंगफिशर एअरलाइन्स कर्ज प्रकरणात ईडी आणि सीबीआय चौकशी करत असताना विजय मल्ल्या देशातून फरार झाला होता. त्याने भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकविले आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.