मुंबई दुर्घटना : केंद्राकडून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख, जखमींना ५० हजारांची घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई दुर्घटना : केंद्राकडून मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख, जखमींना ५० हजारांची घोषणा

नवी दिल्ली : मुंबईत चेंबूर आणि विक्रोळी या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेवर पंतप्रधान, राष्ट्रपती यांसह राष्ट्रीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील विक्रोळी, भांडुप आणि चेंबूर या तीन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सदर दुर्घटनेबाबत अत्यंत दु:ख झाल्याचे म्हटले आहे. शोकाकुल परिवारांप्रती संवेदना व्यक्त करतो. तसेच मदत आणि बचाव कार्यात यंत्रणांना यश मिळो, असेही म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त करतानाच जखमींना लवकर बरे वाटो, अशी प्रार्थना केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शोक व्यक्त केला आहे.