“लस घेतली का?”; चाहत्याच्या प्रश्नावर लारा दत्ताचं हटके उत्तर म्हणाली…

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

“लस घेतली का?”; चाहत्याच्या प्रश्नावर लारा दत्ताचं हटके उत्तर म्हणाली…

अभिनेत्री लारा दत्ताने बॉलिवूडमधून जरी ब्रेक घेतला असला तरी लारा सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. सोशल मीडियावर लारा कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. नुकताच एका चाहत्यांने लाराला सोशल मीडियावर सवाल केला होता. लसीसंदर्भात चाहत्याने विचारलेल्या या प्रश्नाला लाराने हटके उत्तर दिलंय.

लाराच्या एका चाहत्याने नुकताच सोशल मीडियावर तिला एक प्रश्न विचारला. लारा दत्ताने लस घेतली का असा प्रश्न चाहत्याने विचारला. यावर लाराने उत्तर देत काही सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. “होय..मी फोटो शेअर केला नाही याचा अर्थ असा नाही मी लस घेतली नाही.” असं उत्तर लाराने दिलंय. लाराच्या या उत्तरावर तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिली असून प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत

गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी लस घेतली असून यातील काहींनी लस घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र काही सेलिब्रिटींनी लस घेताना असे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले की ज्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं. लसीकरण्याच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर अनेक मीम्सदेखील व्हायरल झाले होते.