पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली : देशात आज, शनिवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि
डिझेलच्या दरांत प्रतिलीटरमागील किंमतीत वाढ झाली आहे. भारतीय बाजारात पेट्रोलचे दर शनिवारी 27 पैसे
प्रतिलीटर आणि डिझेलचे दर 23 पैसे प्रतिलीटर किंमतीने वाढवण्यात आलेत. 
दिल्लीत तेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता पेट्रोलचे दर 96.12 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचे दर 86.98
रुपये प्रतिलीटर इतक्या किंमतीने वाढले आहे. तसेच मुंबईत पेट्रोचे दर प्रतिलीटरमागे 102.30 रुपयांवर पोहोचले
आहे. एक दिवसापूर्वी पेट्रोल- डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून वाढवण्यात आले होते. पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल
28 पैसे या दराने वाढले होते. गेल्या 4 मे ते 12 मे या कालावधीत तब्बल 23 वेळा पेट्रोलचे दर वाढवण्यात आले
आहेत. या दरवाढीमुळे इंधनाच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे. भारत-पाकिस्तान सीमेनजीक असणाऱ्या
श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. इथे पेट्रोल प्रतिलीटर 106.94 रुपये आणि डिझेल 99.80
रुपये प्रतिलीटर या दराने विकले जात आहे.