रिषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा, सौरव गांगुलीने दिली माहिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रिषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा, सौरव गांगुलीने दिली माहिती

भारताचा विकेट कीपर फलंदाज रिषभ पंत याची प्रकृती आता ठीक असून जलद गतीने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे. रिषभला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. तेव्हापासून त्याच्या चाहत्या वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. चाहत्यांची चिंता दूर करण्यासाठी सौरव गांगुलीने रिषभच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.  रिषभला नेमकी कोरोनाची लागण कुठे झाली याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र इंग्लंडमध्ये असताना तो आणि जुलैला डेंटिस्टकडे गेला होता. त्यानंतर जुलैला त्याला लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यावेळी त्याला लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तो इंग्लंडमधील आपल्या नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात असल्याचे सांगण्यात येत आहे.