डेव्हन कॉनवेने षटकार खेचत झळकावले दुहेरी शतक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

डेव्हन कॉनवेने षटकार खेचत झळकावले दुहेरी शतक

लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. डावखूऱ्या
सलामीच्या फलंदाजाने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. कॉनवेने मार्क वुडला षटकार
मारत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. कॉनवेने ३४७ चेंडूत दुहेरी शतक पुर्ण केले. तो इंग्लंडमध्ये पदार्पण करताना
दुहेरी शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू आहे.
कॉनवेने ३४७ चेंडूत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. कॉनवेने त्याच्या दुहेरी शतकात २२ चौकार आणि एक षटकार
लगावला. मात्र, पुढच्याच षटकात कॉनवे धावबाद झाला आणि न्यूझीलंडचा पहिला डावदेखील संपला. न्यूझीलंडने
पहिल्या डावात ३७८ धावा केल्या. कॉनवेने २००, हेनरी निकल्सने ६१ आणि नील वॅग्नरने नाबाद २५ धावा केल्या.
डेव्हन कॉनवे कसोटी क्रिकेट इतिहासातील एकमेव फलंदाज आहे ज्याने पदार्पणाच्या पहिल्या डावात एका
षटकारासह डबल शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या आणखी दोन खेळाडूंनी षटकार मारून दुहेरी शतके
पूर्ण केली आहेत.